शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

सा.स. मूल्यमापन नोंदी एक्सेल सॉफ्टवेअर

 शिक्षक मित्रानो नमस्कार !
आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या नोंदी करणे फार वेळखाऊ आहे. जर वर्गातील विद्यार्थी संख्या जास्त असेल तर मग हेच काम अजून अवघड होते. यासाठी एक एक्सेल सॉफ्टवेअर तयार केलेले असून ते आपले काम निश्चितच सोपे करणार आहे. सध्या इयत्ता १ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेले असून ५ वी ते ८ वी साठी लवकरच अपलोड करत आहे.

मूल्यमापन नोंदी एक्सेल सॉफ्टवेअर वापरण्यापूर्वी खाली दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा.

 खाली दिलेल्या बटणावर क्लिक करून आपण ते डाऊनलोड करू शकता.
https://drive.google.com/uc?export=download&id=0B1OERS5aa410YW1DUmJFcTM1bnc
 डाऊनलोड लिंक - २  Click Here

अनप्रोटेक्ट पासवर्ड - cce



या एक्सेल सॉफ्टवेअरचा वापर कसा कराल ?

या  सॉफ्टवेअरमध्ये प्रामुख्याने ४ प्रकारच्या शीट आहेत –
1. Home :-
ही मुख्य शीट असून यामध्ये आपल्या शाळेचे नाव, वर्ष, इयत्ता वगैरे माहिती भरून घ्यावी. प्रथम सत्र विद्यार्थी द्वितीय सत्र विद्यार्थी या शिर्षकाखाली त्या त्या सत्रातील विद्यार्थी यादी लिहावी. विद्यार्थ्याचे नाव लिहिताच क्रमांक आपोआप येतो. विद्यार्थ्याच्या नावापुढे त्याचे लिंग न विसरता निवडावे. त्यासाठी Dropdown लिस्ट दिलेली आहे, त्यातून योग्य त्या पर्यायाची निवड करावी.
आपण मूल्यमापनासाठी कोणती आकारिक तंत्रे निवडणार आहात ती निवडून त्याची गुण विभागणी करून ठेवावी.

2. Nondi :-
या शीटवर विषयनिहाय मुलासाठी व मुलीसाठी नोंदी करून घ्याव्यात. याच नोंदी आपल्याला विद्यार्थ्याच्या नोंद तक्त्यावर दिसणार आहेत. काही नोंदी नमुन्यादाखल करून दिल्या असून त्यात आपण बदल करू शकतो.

3. F नावाच्या शीट :-
या First टर्म म्हणजे प्रथम सत्रासाठी आहेत. एका विद्यार्थ्याला एक शीट वापरलेली असून आपल्या वर्गात जर २० पेक्षा जास्त विद्यार्थी असतील तर शेवटची शीट कॉपी करून आपल्याला हव्या तितक्या शीट तयार करता येतात. कंसातील आकडे विद्यार्थ्याचा हजेरी क्रमांक दाखवतो. नवीन शिट तयार केल्यावर वर हजेरी क्रमांक न विसरता भरावा, अन्यथा शीट काम करत नाही.

4. S नावाच्या शीट :-
या Second टर्म म्हणजे प्रद्वितीय सत्रासाठी आहेत. एका विद्यार्थ्याला एक शीट वापरलेली असून आपल्या वर्गात जर २० पेक्षा जास्त विद्यार्थी असतील तर शेवटची शीट कॉपी करून आपल्याला हव्या तितक्या शीट तयार करता येतात. कंसातील आकडे विद्यार्थ्याचा हजेरी क्रमांक दाखवतो. नवीन शिट तयार केल्यावर वर हजेरी क्रमांक न विसरता भरावा, अन्यथा शीट काम करत नाही.

F व S नावाच्या शीटवर विद्यार्थ्याच्या नोंदी करायच्या असून त्यासाठी संबंधित चौकटीजवळ Down Arrow दिसेल, कारण नोंदी निवडण्यासाठी Dropdown लिस्ट दिलेली आहे. त्यातून लागू पडत असलेली नोंद घ्यावी.

शीटचा Unprotect पासवर्ड cce असा आहे.