शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

आपल्या शाळा नावारूपाला आणायच्या असतील तर मुख्याध्यापक यांनी करायची कामे1.शाळेत केंव्हा पण येणे जाणे टाळा
2.शाळेतून सर्वांबरोबर वेळेनुसार घरी जा.
3. पूर्ण वेळ नियमाने व्यवस्थापन करा,अतिरेक करू नका
4 .स्वतःची गुणवत्ता दररोज तपासा.
5. गणवेशाचा आग्रह स्वतःला पण ठेवा.
6.शिक्षक पण माणसंच आपली वैरी नाहीत हे लक्ष्यात ठेवा.
7. गैरहजरीचे निमित्त शाळेच्या कामासाठी सांगणे बंद करा.
8. मुख्याध्यापकने शिक्षक आणि शिक्षिका बरोबर प्रेमाने नियमाने मर्यादा ओळखून वागावे
9. शिक्षकाना त्याच्या हक्काचे सहकार्य मोकळ्या मनाने करावे
10 .आपण मालक आहोत म्हणुन शिक्षकांना विश्वासात न घेता काम करू नका.एकीचे बळ हेच खरे असते
11.आपण स्वतःचाच विचार न करता शिक्षकांचा , विद्यार्थ्याचा अर्थात शाळेचा विचार करा. मुख्याध्यापकने गटबाजी करायची नसते यांचे भान ठेवा
12.शाळेत राजकारणाचा वापर न करता ज्ञानाचा वापर करा आणि स्वतःचा हट्टीपणा / इगो सोडा.
13 .व्यवस्था ढासळली म्हणजे आपण चुकत आहोत याची जाणीव आहे का ते पहा.
14.मुख्याध्यापकांनी बाहेर टाईमपास करणे थांबवा आणि शाळेेत वेळ द्या.
15 .आपण बाहेर जाताना ज्येष्ठ शिक्षकांना सांगूनच जाणे कारण आपण जबाबदार व्यक्ती आहोत
याची जाणीव ठेवा.
16.तुम्ही कोणालाही चुकीची कामे करा असे सांगुन पुन्हा त्याच्या वर रागवू नका.
17. कोणताही निर्णय स्वतःच घेऊन ड्युटीचा त्रास करून घेऊ नका.
18. गुमान ड्युटी करणाऱ्यां शिक्षकांना कमी समजू नका अन् अपमानीतही करु नका.
19. फक्त मुख्याध्यापक आपणच शाळेचे नाव उज्ज्वल करू शकतो हे विसरुन टाका नाही तर शाळा ढासळेल,सर्वांचीच गरज असते.
20 .आपल्या आजूबाजूचे सर्व अज्ञानी आहेत ,त्यांना यातले काय माहिती काय ??? असे समजू नका तर सगळ्यांना घेऊन काम करा
21.आपल्या चांगल्या आदर्शाने इतरांना चालना मिळेल आपली उंची वाढेल असे
22. कुणी चांगले काम करत असेल त्याला प्रोत्साहन दया . निंदानालस्ती करु नका ,नावे ठेऊ नका याउलट त्यांना सहकार्य करा.
23. शाळा संहिता नियम सर्वांना सारखा आहे हे विसरू नका
24.काम करणाऱ्याना त्रास देऊ नका. स्वतःच्या बुद्धीचा वापर सक्तीने करु नका .तुम्हीही कर्मचारी आहात हे कदापि विसरू नका...
25.वरिष्ठांचा आदर करा...(वयाने आणि नियुक्तीने ,ज्ञानाने ,अनुभव असलेल्या) लोकांना जवळ घेऊन काम करा.
26.खरे ते स्वीकारा ,मान्य करा....माझे तेच खरे असा अट्टाहास धरू नका..नियमाचा आदर करा
27.आपला अमूल्य वेळ दुसऱ्याना कमी लेखण्यात , टीका, निंदा करण्यात घालवू नका. मुख्याध्यापकने घमेंड,अहंकार व गर्विष्ठ असता कामा नये अन्यथा शाळेचे नुकसान अटळ
28.सहकाऱ्यांच्या विषयी जाणीवपूर्वक गैर समज पसरवू नका..कारण तेच आपल्या कामाचे हात आहेत
29.आपला अमूल्य वेळ शाळेत घालवा....बाहेर राजकारणात नाही समजून घ्या...
कारण समाजात आणि शाळेत आपण ज्या गोष्टी देतो त्याच गोष्टी आपल्याकडे परत येत असतात...
लक्षात घ्या विद्यार्थी,पालक व समाज या सर्वांचेच आपल्या कृतीकडे बारकाईने लक्ष असते