शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

शालेय पोषण आहार 5.1

नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो !
मी या आगोदर तयार केलेले शालेय पोषण आहार एक्सेल सॉफ्टवेअर महाराष्ट्रातील असंख्य शिक्षक बंधू भगिनी वापरत आहेत, त्याबाबतचे आपले असंख्य अभिप्राय मी वाचले आहेत ! 

शालेय पोषण आहार 4.1 मध्ये मिरची पावडर, भाजीपाला, आणि पूरक आहार हे कॉलम वाढविण्याबाबात  अनेक फोन, मेसेज व मेल मला मिळाले होते. नवीन एक्सेल सॉफ्टवेअर 5.1 आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. या मध्ये आपल्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे सॉफ्टवेअर देखील आपल्याला खूप आवडेल अशी खात्री आहे. 

सॉफ्टवेअरची वैशिष्ट्ये-
1) पूर्णपणे युनिकोड मध्ये बनविले आहे, त्यामुळे कोणत्याही मोबाईल वरून किंवा कॉम्पुटरवर वापरता येईल.
2) फक्त रोजची उपस्थिती व वापरलेले कडधान्य नोंदवावे लागते. 
3) मासिक उपयोगिता, मासिक ऑनलाईन रिपोर्ट, वार्षिक उपयोगिता हे सर्व रिपोर्ट आपोआप तयार होतात.
4) सर्व मालाची साठा नोंदवही आपोआप तयार होते.
5) सर्व रिपोर्ट, साठा नोंदवही, तसेच प्रत्येक महिन्याची नोंदवही या सर्वांची A4 साईज किंवा Legal  साईज पानावर प्रिंट काढता येते. 

4.1 पेक्षा नवीन काय बदल झाले आहेत?
1) मिरची पावडर, भाजीपाला व पूरक आहार नोंद हे कॉलम नव्याने ऍड केले आहेत.
2) आपल्या सोईनुसार  A4 साईज किंवा Legal  साईज मध्ये वापरण्यास उपलब्ध आहे.
3) जास्त पट असणार्‍या शाळांनी माहिती भरल्यास सेलची रुंदी कमी पडत होती त्यामुळे  ###### असा एरर येत होता, आता सेलची रुंदी पुरेशी वाढविल्यामुळे असा प्रॉब्लेम येणार नाही.

या आगोदरची शीट 4.1 वापरत असल्यास-
1) सध्या जर आपण शालेय पोषण आहार 4.1 वापरत असाल तर आणि आपल्याला नविन बदल झालेली ही शीट यापुढे वापरायची असल्यास सर्व माहिती पुन्हा भरण्याची गरज नाही.
2) आपण दररोज ज्या 3 कॉलम मध्ये माहिती भरतो ( पट, उपस्थिती, कडधान्य प्रकार ) ते 3 कॉलम सिलेक्ट करुन कॉपी करा व नवीन शीटमध्ये पेस्ट करा.
3) मागील शिल्लक, प्राप्त साहित्य इ. माहिती असणारे रो देखील याप्रमाणे कॉपी पेस्ट करुन अगदी 1 मिनीटाच्या आत तुमची नवीन एक्सेल शीट वापरण्यासाठी तयार होईल.



पासवर्ड- mdm

शीट डाऊनलोड करण्यासाठी DOWNLOAD वर क्लिक करा.

अ.क्र.
इयत्ता
A4 साईज
Legaal साईज
1
1 ली ते 5 वी
2
6 वी ते 8 वी




वर दिलेल्या लिंकवरुन डाऊनलोड  झालेली फाईल ओपन होत नसेल खाली दिलेल्या बटणावर क्लिक करुन झिप फाईल डाऊनलोड करून घ्या व नंतर अनझिप करुन वापरा.