शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

शिक्षकरत्न पुरस्कार वितरण सोहळा जत


         जि.प. शाळा कौठुळी ता. आटपाडीचे तंत्र स्नेही , संयमी सहशिक्षक परशुराम शिंदे यांना विश्व रत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्था माडग्याळ (जत) यांच्याकडून आदर्श शिक्षक रत्न पुरस्काराने यथोचित सन्मानित करण्यात आले. भारतीय संविधान दिन 26 नोव्हेंबर रोजीच्या 68 व्या गौरव दिनानिमित्त व थोर समाज सुधारक महात्मा  जोतिबा फुले यांच्या स्मृतीदिनाननिमित्त विश्वरत्न सामाजिक बहुउद्देशिय सेवाभावी संस्था माडग्याळ तालुका जत जिल्हा सांगली च्या वतीने जत येथे साईप्रकाश मंगल कार्यालय च्या सभागृहात विविध क्षेत्रातील सामाजिक,आरोग्य विषयी,क्रिडाविषयी,शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या वेगवेगळ्या  क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्ती चा संस्थेच्या वतीने सत्कार व पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक 26 नोव्हेंबर 2017 रोजी आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विक्रदादा सावंत जिल्हा परिषद सदस्य, सरदार पाटील जिल्हा परिषद सदस्य, महादेव पाटील जिल्हा परिषद सदस्य, माननीय राज्याध्यक्ष शामराव जवंजाळ महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना, सुरेश भाऊ पाटील,डी सि सी संचालक सांगली,तसेच प स सदस्य विष्णू चव्हाण व श्रीदेवी जावीर, ,जतचे गट शिक्षणाधिकारी मा. जगधनेसाहेब , संतोष काटे सर, संस्थेच्या अध्यक्ष्या सौ वंदना काटे व सदर संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.